सुरेशभाई सोनवणे : राजकारणातील ‘वाट’ हरवूनही स्वतःची ‘वाट’ चालत राहिलेला बेफिकीर आणि बेधडक इसम
सुरेशभाईंनी जातीचे कार्ड कधीही वापरलं नाही. इतका प्रचंड मित्रपरिवार असूनही, शेवटच्या काही वर्षांत सोनवणे स्वतःच्या कोषातून बाहेर येऊ शकले नाहीत. राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि राजकीय प्रवाह किती वेगाने पुढे सरकतो, हे त्यांना फारसं उमगलं नाही की, ठरवून त्यांनी स्वतःला दूर ठेवलं, माहीत नाही. परिणामी, त्यांचं ज्ञान व अनुभवाचा ना समाजाला फायदा झाला, ना काँग्रेस पक्षानं त्यांचा उपयोग करून घेतला.......